सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
रोहा तालुक्यातील खांब नाक्यावर खाण्याच्या शोधात वानराचा मोर्चा वळल्यामुळे एक खळबळ उडाली असुन यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बाजूला असणाऱ्या जंगलातून वानर खांब नाक्यावरील दुकानात शिरल्या नंतर एकच खळबल उडाली आहे. परंतु हा वानर खाण्याच्या शोधात आला असावा असा असा अंदाज आहे. कारण लोकांनी दिलेली बिस्किटे,फळे,त्यांनी सेवन केली. मानवाने केलेली प्रचंड वृक्षतोड,शिकारीसाठी लावण्यात येणारे वणवे यामुळे दिवसेंदिवस जंगल संपत्ती नष्ट होत असल्यामुळे पशुपक्षी व प्राणी यांना जंगलात खाण्यासाठी पुरेशी फळे,फुले राहिली नसल्यामुळे त्यांचे जिव धोक्यात आल्यामुळे अनेक पक्षी व प्राणी यांचा मोर्चे गावात तसेच शहरात वळलेले दिसुन येत आहे.
याच प्रमाणे सध्या वानरांचा मोर्चा हा गावाकडे वळलेला दिसुन येते कारण हे वानर खाण्यासाठी कोलाड, खांब, तसेच पाली बाजारपेठेत दिसून येत आहेत. असे असले तरी या वानरांपासुन लोकांना इजा ही होऊ शकतात यासाठी योग्य ती खबरदारी घेणे जरुरीचे आहे.








Be First to Comment