Press "Enter" to skip to content

रायगडच्या दिव्यांगाच्या मदतीसाठी धावून आले मुंबईतील उद्योजक गुलप्रित सिंग

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर येथे मुसळधार पावसामुळे पूर येथून दिव्यांग बांधवसाहित हजारो कुटुंबाचे संसार उद्धव झाले आहेत. दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी मुंबईतील उद्योजक गुलप्रित सिंग हे धावून आले आहे ही कौतुकास्पद आहे.

रायगड जिल्हयातील दिव्यांग बांधव यांचे जुलै 2021 मध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर येथील नागरिकांना काहीतरी मदत करावी अशी इच्छा मुंबईतील उद्योजक गुलप्रित सिंग आई फाउंडेशनचे उपाध्यक्ष सागर पवार यांच्याकडे बोलवून दाखवली.सागर पवार यांनी सांगितले की धडधाकट पूरग्रस्त यांना मदत मिळत आहे मात्र दिव्यांग हे मदत घेण्यासाठी जाऊ शकत नसल्याने त्यांना मदत मिळत नाही.ते मदतीपासून वंचित राहत आहेत.त्यांना मदत करण्याचे पवार यांनी सांगितले. त्यांच्या विचारांची सहमत होत त्यांनी दिव्यांग बांधवांसाठी ब्लँकेट,सतरंजी देण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी ताबडतोब सदर वस्तू खरेदी करून सागर पवार यांच्या ताब्यात दिव्यांग बांधवांसाठी दिल्या.

गुलप्रित सिंग यांनी दिव्यांग बांधवांना मदत करावी हे मनात घेऊन त्यांनी दिव्यांग बांधव यांना मदत केली आहे.हे खरोखरच कौतुकास्पद आहे.गुलप्रित सिंग यांनी दिव्यांग बांधवांना देण्यात आलेली मदत सागर पवार यांनी महाड तालुक्यातील ढाळकाठी येथे जाऊन दिव्यांग बांधवांना दिलेली मदत पोहच केली .यावेळी दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.