Press "Enter" to skip to content

स्व.सुनंदा शंकर मोहिते यांच्या १८ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील खांब येथील सामाजिक कार्यकर्ते दिलिप मोहिते यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न करण्यात आले.

श्री.दिलिप मोहिते यांच्या मातोश्री स्व.सुनंदा शंकर मोहिते यांचे १८ वे पुण्यस्मरणपर सदर कार्यक्रम संपन्न करण्यात आले. यावेळी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण,पूजाविधी, तसेच ह.भ.प.मारूतीमहाराज कोलाटकर यांची आईचे आपल्या जीवनातील महती या विषयावर प्रवचनपर सेवा आदी कार्यक्रम संपन्न करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते दिलिप मोहिते व त्यांचे दोन भाऊ गेली १७ वर्षे आपल्या आईच्या स्म्रुती कायमच आपल्या सोबत रहाव्यात या उद्देशाने आपल्या आईच्या पुण्य स्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न करीत आले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.