Press "Enter" to skip to content

जय हनुमान मंडळाच्या वतीने पुरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

जय हनुमान क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ तळवली तर्फे अष्टमी रोहा यांच्या वतीने महाड व पोलादपूर येथील पुरग्रस्तांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने करण्यात आले. यावेळी पर्यावरण विभाग महाराष्ट्र सरचिटणीस सचिन मोरे,परशुराम रटाटे,गणेश खरिवले व अन्य सहकारी उपस्थित होते हात मदतीचा देऊन जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

एकमेकांना देऊ साथ,पुढे करू मदतीचा हात या भावनेतून पुरग्रस्तांना पाणी बाँटल,बिस्किट पुडे,पत्रावळी,ग्लास, साबण,कोलगेट, टाँवेल, कडधान्ये आदी जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

महाड-पोलादपूर येथील पुरग्रस्तांच्या मदतीला हजारो हात पुढे सरसावले आहेत.तर आपलाही खारीचा वाटा असावा या भावनेतून व सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून महाड-पोलादपूर येथे जाऊन मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच काही ग्रामस्थ यांनी सदर साहित्याचे वाटप केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.