सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
ऐनघर ग्रामपंचायतीच्या ग्रा.पं.सदस्या अर्चना भोसले यांच्या प्रयत्नातून ऐनघर ग्रामपंचायतीच्या फंडातून बाळसई येथे अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच बाळसई गावाचे उपाध्यक्ष रणजित शेडगे यांच्या शुभहस्ते पार पडले.
या प्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन भोसले,निवृत्त आधिकारी अनंता मुंडे, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र तेलंगे,प्रतिष्ठीत नागरीक रघुनाथ मुंडे,माऊली मोरे,गावाचे खजिनदार यशवंत भोसले,दत्ता पाटेकर, अशोक पाटेकर,सुनिल मोरे,प्रमोद पाटेकर, मनोज तेलंगे,बबन तेलंगे,मनोज भोसले आदी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना उपाध्यक्ष रणजीत शेडगे म्हणाले की यापुढे बाळसई गावातील विकास कामे ही वेगाने होणार असून एक कर्तत्वान सदस्य निवडून दिल्यामुळे गावात विकासाचे पाऊल पडताना दिसत आहे.तसेच माजी ग्रा.सदस्य सचिन भोसले यांनी गावाने सदस्य म्हणून अर्चना भोसले यांना निवडून दिले आहे त्यांचे ऋण सदैव असून ते विकासकामांच्या माध्यमातून फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा मानस व्यक्त केला.








Be First to Comment