Press "Enter" to skip to content

रसायनी परिसरातील ग्रामपंचायतीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे‌ यांची 101 वी जयंती सद्य परिस्थितीमध्ये कोरोना या रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन व सोशल डिस्टन्स ठेवून सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन रसायनी परिसरातील ग्रामपंचायत वावेघर, ग्रामपंचायत वासांबे मोहोपाडा, ग्रामपंचायत तूराडे, ग्रामपंचायत गुळसुंदे येथील कार्यालयामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजा व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

वावेघर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन आणि प्रतिमेला पुष्पहार सरपंच विजय चव्हाण मानवहित लोकशाही पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष कृष्णा झोंबाडे व तूराडे ग्रामपंचायत उपसरपंच विश्वनाथ गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले .यावेळी प्रमुख उपस्थिती असलेले कृष्णाजी झोंबाडे म्हणाले की, तरुणांनी सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन थोर नेत्यांचे विचाराने कार्य करून समाजाची प्रगती करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले.
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने ग्रामपंचायत वासांबे मोहोपाडा, ग्रामपंचायत गुळसुंदे, ग्रामपंचायत तूराडे कर्मचारी येथे कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

ग्रामपंचायतीच्यावतीने पुष्पहार व श्रीफळ इत्यादी वस्तूंचे सोय करण्यात आली होती तसेच तुराडे ग्रामपंचायतीच्या वतीने जयंतीसाठी पुष्पहार श्रीफळ आणि उपस्थितांसाठी अल्पोपहार यांची सोय करण्यात आली होती.त्यामुळे विश्वनाथ गायकवाड यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि कर्मचारी वर्गाचे आभार व्यक्त केले. यावेळी कार्यकर्ते उमेश खुडे,हिंदुराव बाबर, काशिनाथ खुडे, हनुमंत साठे, विनोद कांबळे, प्रथमेश गायकवाड,गणेश कांबळे,दीपक मरसाले, नवनाथ त्रिभुवन आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.