सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
राज्य परिवहन महामंडळ रोहा आगारात वाहक या पदावर प्रामाणिकपणे आपल्या सेवेचा कार्यकाल पुर्ण करून मालसई गावचे प्रतिष्ठित नागरिक विठ्ठल गौरु आयरे वयोमानानुसार सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाले आहेत.
गेली ३४ वर्षे कोलाड, तळा,रोहा व नागोठणे येथे हंगामी एसटी डेपो कंट्रोलर व वाहक या पदावर कार्यरत होते.मालसई या छोट्याशा खेडेगावातून २५ फेब्रुवारी १९८८ रोजी ते रोहे डेपोमध्ये वाहक या पदावर आपल्या सेवेमध्ये रूजू झाले.आपली प्रामाणिक सेवा व सहकार्याची भावना यामुळे त्यांचे सर्वांशी सौदार्याचे व स्नेहपूर्वक संबंध होते.तर एक उत्कृष्ट सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून व त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना महामंडळाकडून वेळोवेळी सन्मानितही करण्यात आले.
वाहक या पदावर व हंगामी कंट्रोलर पदावर कार्यरत राहून सन्मानाने सेवानिवृत्त झालेल्या विठ्ठल आयरे यांच्या उत्कृष्ट व अविरत सेवेबद्दल त्यांच्या परिवाराकडूनही आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सन्मानचिन्ह, शाळ व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी राजेंद्र कामथे,प्रदीप खेरटकर,सुजीत मरवडे,विक्रम आयरे व आयरे परिवारातील सदस्य उपस्थित होते.तर वाहक व हंगामी कंट्रोलर म्हणून आपली सेवा प्रमाणिकपणे बजावणा-या विठ्ठल आयरे यांनी आपल्या सेवाकाळातील आलेले अनुभव याबाबतचे आपले मनोगत व्यक्त केले.








Be First to Comment