Press "Enter" to skip to content

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत

सिटी बेल | श्रीनिवास काजरेकर | नवीन पनवेल |

सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेल रायगड, या संस्थेच्या वतीने महाड आणि चिपळूण परिसरातील पूरग्रस्ताना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य करण्यात आले. संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, धान्य, दूध, पाणी, सुका खाऊ जीवनावश्यक वस्तू जमा केल्या.

महाड येथील पूरग्रस्ताना जवळपास चार टन साहित्य वितरण करण्यासाठी शलाका वारांगे आणि सौरभ वारांगे यांनी मोलाचे सहकार्य केले. सात टन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कलंबस्ते आणि दळवटणे गाव तसेच गणेश नगर, रामवाडी आणि इतर वाड्यांवर वितरीत करण्यात आला. या कार्यात अध्यक्ष केशव राणे, उपाध्यक्ष संतोष चव्हाण, सचीव बाप्पा मोचेमाडकर, सहसचीव वासुदेव सावंत, खजिनदार अनिल नेमळेकर, प्रीता भोजने, प्रिया खोबरकर, प्रदीप रावले, दीपक तावडे, बाबाजी नेरूरकर संपर्क प्रमुख अपूर्वा प्रभू,सदस्य नंदकुमार वाघाटे,कार्यकर्ते अभय प्रभू,संजय गोवेकर,राजेश वायगंकर,दत्ताराम सुतार, दक्षता सुतार,अर्चना तावडे,आरती सावंत, रश्मी वाघाटे,कल्पना राणे, ज्ञानेश्वर आंगणे, रंगनाथ नेरूरकर,संतोष नेरूरकर, सचिन नेरूरकर, यश मोचेमाडकार, देवेश सावंत,अनिकेत पालव,अभिषेक पालव, प्रतीक भोजने, संकेत पवार आदी कार्यकारणी सदस्य व कार्यकर्ते असे सहभागी झाले होते. अनेक दानशूर व्यक्तींनी जीवनावश्यक वस्तू,पाणी, आर्थिक, इतर साहित्य देऊन मदत केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.