Press "Enter" to skip to content

माजी सरपंच संदिप मुंढे यांच्याकडून रस्त्यावरील खड्यांची डागडुजी

वाहनचालक प्रवाशांनी मानले आभार

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |


दांड रसायनी रस्त्यावर रसायनी वृंदावन,मोहोपाडा बॅक ऑफ इंडिया,मोहोपाडा प्रवेशद्वार या रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना, प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. खड्ड्चे साम्राज्य पाहायला मिळत आहे . कंत्राटदाराने केलेलं नित्कृष्ठ दर्जाचे काम व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारामूळे अनेक खड्डे महत्त्वाच्या ठिकाणी पडले आहेत.खड्यांमुळे या रस्त्यावर अपघातांना आमंत्रण मिळत होते.सदर परिस्थिती माजी सरपंच संदिप मुंढे यांनी लक्षात घेऊन स्वखर्चाने दांड ते रसायनी या रस्त्यावरील खड्ड्यांत सिमेंट मिक्स खडी टाकून बुजविले आहेत.

पावसामुळे दांड रसायनी रस्त्यावर खड्डयात पाणी भरपूर प्रमाणात साचत असल्याने दुचाकी अथवा चारचाकी वाहन चालवताना खड्डे चुकविता वाहनचालकांची तारांबळ उडत आहे.यामुले खड्यांत वाहन आदलल्याने तसेच खड्यांतून मार्ग काढताना अनेकांच्या वाहनांना अपघात होऊन काहींना कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास झाला आहे.दांड-रसायनी रस्त्यावरील रसायनी वृंदावन फ्लोरा प्रवेशद्वार,जनता विद्यालय वळन,मोहोपाडा थांबा आदी रस्त्यावर भलेमोठ्या व्यासाचे खड्डे पडल्याने गेल्या महिनाभरापासून चालीसपेक्षा जास्त अपघात झाले.यात काही दुचाकी वाहनचालकांना गंभीर दुखापत झाली आहे.

सदर समस्या अनेकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मांडल्या परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुर्लक्ष राहिल्याने माजी सरपंच संदिप मुंढे यांनी स्वतः हून सिमेंट काॅकेट मिश्रण असलेला माल खड्यात टाकून खड्डे बुजविल्याने माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या कामाचे वाहनचालक, प्रवाशांकडून कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.