Press "Enter" to skip to content

काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वडगाव जि.प.हद्दीतील माजगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस नरेश दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव जि.प.विभागातील लोहोप येथे सभामंडप उदघाटन, माजगाव येथे गणेशघाट उदघाटन व गटर बांधकाम भुमिपुजन इत्यादी कामांचे लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.नरेश पाटील यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करुन पूरग्रस्तांना मदत देत काहीअंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

त्याप्रसंगी रायगड जि.प.सदस्या पद्माताई सुरेश पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश पाटील, खालापुर पंचायत समिती उपसभापती विश्वनाथ पाटील, कर्जत – खालापुर मतदारसंघ विधानसभा अध्यक्ष संतोष बैलमारे,माजगाव सरपंच गोपिनाथ जाधव,आर.पी.आय जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कांबळे,सावरोली जेष्ठ नेते नंदू पाटील, माजी सरपंच संतोष ठोंबरे,उमेश ठोंबरे,संदिप पाटील,इसांबे ग्रामपंचायत उपसरपंच अनंता पाटील,सदस्य भरत हिलम, वडगाव ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार पाटील, हरेश पाटील, जेष्ठ ग्रामस्थ सुर्याजी दादा पाटील,जयवंत पाटील,चंद्रकांत पाटील, विलास कांबळे,बबन पाटील, नामदेव पाटील, यशवंत पाटील, रणधीर पाटील, कृष्णा पाटील, किशोर पाटील, योगेश ढवाळकर,नामदेव वाघे,संदीप ठोंबरे,नरेंद्र मालकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.