Press "Enter" to skip to content

पुरग्रस्ताच्या मदतीसाठी सरसावले शिवतेज फिटनेस सेंटरचे हात

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

मागील दोन आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाने पुरस्थिती निर्माण केल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले.घरात होते तेवढे पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेल.घरामध्ये धान्याचं दाणा शिल्लक राहिला नाही,रायगड,चिपळूण अश्या विविध जिल्ह्यात पावसाने उग्र रुप धारण केल्यामुळे अनेकांनी मदतीसाठी हात पुढे सरसावत होते.विविध संस्था,दानशूर व्यक्ती अदि या पुरग्रस्ताच्या मदतीला धावले.तर काही तरुण वर्गांनी वर्गणी काढून मदत केली. शिवतेज फिटनेस सेंटर छत्तीशी विभाग वावोशी यांच्याकडुन पेठ नाका चिपळूण यांच्या माध्यमातून विविध वस्तू स्वरुपात मदत केली.

यामध्ये पाणी बॉक्स ५०,चटई १५०,चादर १५०,टॉवेल १५०, मेणबत्ती १५० बॉक्स
माचिस,ओडोमॉस ३०० आश्या विविध वस्तू स्वरुपात मदत केली.कोकणातील माणसे पुराच्या पाण्यामध्ये वेढले गेल्यामुळे घरातील वस्तू घराब झाल्यामुळे त्याच्यासाठी छोटीशी मदत व्हावी या उद्दात विचारांतून व्यायाम शाळेतील तरुण वर्गांनी मदतीचा हात पुढे केला.

डोळ्यादेखत होत्याच नव्हत झाल.यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातून प्रत्येक जण आपल्याला शक्य होइल या विचारांतून मदत त्यांच्या पर्यंत पोहचविण्याचे काम या तरुण वर्गांने केले.निलेश कदम,पंकज देशमुख,मयुर शेलार,प्रदीप थोरवे,गितेश खरिवले,विश्वनाथ भोसले,दुर्वश कदम,भूषण शेलार,अनिकेत पाटील,दिनेश कदम,विश्वास जाधव अदि तरुण वर्गांनी मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहचविली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.