Press "Enter" to skip to content

शिक्षक बांधवांचा महाडच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

महाड येथील महापुरात पूरग्रस्त झालेल्या गावात प्रत्यक्षात जाऊन पूरग्रस्त भागात 33 कुटुंबाना जीवनउपयोगी वस्तु वितरित करण्यात आल्या.त्यामध्ये चटई,ब्लॅंकेट, टॉवेल, खाण्यासाठी बिस्किटे, चॉकलेट आदी वस्तूंचा समावेश होता.


पूरग्रस्त भागांत मदत करण्यासाठी वेगवेगळ्या शहरातील शिक्षक वृंद एकत्रित येऊन सामाजिक बांधिलकी जपत आपल्या एकत्रित संकल्पनेतुन खारीचा वाटा म्हणून 33 कुटुंबामध्ये किट वाटप करण्यात आले.तसेच इतरांनाही आपल्या माध्यमातून मदत करण्याचे आव्हान केले आहे.

बाधित झालेल्या महाड मधील नागरिकांना योग्य मदत मिळवून देण्यासाठी तेथील शिक्षक प्रदीप पवार यांनी योग्य नियोजन करून त्यांच्या समवेत प्रमोद झावरे पनवेल, , उमेश म्हात्रे अलिबाग, संतोष पाटील सारडे, प्रविण पाटील उरण, राम गेंड चेंबूर, ज्ञानेश आलदर पनवेल, बाळकृष्ण कोठेकर डोंबिवली, विनोद घोरपडे कोपरखैरणे, कविता पाटील पनवेल , सायली पाटील मॅडम उरण,नरेंद्र म्हात्रे अलिबाग,संतोष पाटील कोप्रोली उरण, प्रतिभा कासारे पनवेल ,सुप्रिया पाटील पनवेल ,मानसी पोटे पनवेल, गणेश कडू पनवेल ,दौलत कोयंडे पनवेल ,सुनील चंदनशिवे पनवेल, श्रीकांत सुतार पनवेल ,विनोद तुपलोंढे पनवेल इत्यादी शिक्षकांनी मदतीचा हात पुढे केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.