Press "Enter" to skip to content

विविध समस्यांवर सामाजिक संस्थाद्वारे चर्चा सत्र परिषदेचे आयोजन

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी जनआंदोलन, प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न इत्यादी विषयावरील चर्चासत्रासाठी सामाजिक संस्थांची परिषद गुरुवार दिनांक 5/8/2021 रोजी दुपारी 3 वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह, तेलीपाडा उरण येथे आयोजित करण्यात आले आहे.

नवी मुंबई येथे उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बळकटी मिळण्यासाठी सामाजिक संस्थांचा सहभाग महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे.

विमानतळ नामकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्त संघटित झाले असताना गावठाण विस्तार,गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणे, विमानतळ बाधितांचे प्रश्न, नव्याने सुरु होणारे भूसंपादन, सागरी किनारी असलेल्या प्रकल्प बाधित आगरी कोळी कराडी समाजाचे प्रश्न, प्रकल्पग्रस्तांचे प्रशिक्षण आणि रोजगाराचा प्रश्न इत्यादी विषयावर चर्चा होणे अपेक्षित आहे.या सर्व गोष्टींचा विचार करता मुंबई, ठाणे,पालघर, नवी मुंबई,रायगड या विभागातील सामाजिक संस्थांची परिषद दि 5/8/2021 रोजी दुपारी 3 वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह, ओ.एन.जी.सी कॉलनी जवळ,तेलीपाडा उरण येथे आयोजित करण्यात आले आहे.

या परिषदेस सर्व सामाजिक संस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील,दिनेश घरत कार्याध्यक्ष, भुषण पाटील कार्याध्यक्ष,संतोष पवार सरचिटणीस, सीमा घरत महिला आघाडी प्रमुख यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.