Press "Enter" to skip to content

भोईघरचे माजी सरपंच निलेश घाटवळ यांनी हाती बांधले शिवबंधन

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते सेनेचा भगवा घेतला खांद्यावर

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

मुरूड तालुक्यातील भोईघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निलेश घाटवळ यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते हाती शिवबंधन बाधित सेनेचा भगवा परत एकदा खांद्यावर घेतला आहे.

भोईघरचे माजी सरपंच निलेश घाटवळ यांच्या प्रवेशवेळी मुरूड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य संतोष निगडे सहित अलिबाग विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.
निलेश घाटवळ हे सन2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून तत्कालीन जिल्हापरिषद सदस्य तथा विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांच्यासमवेत बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांमध्ये घाटवळ देखील होते. सन2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सेनेचे तत्कालीन उमेदवार महेंद्र दळवी यांना त्यांच्या बारशिव या गावातून 125 मते मिळवून दिली होती.

तद्नंतर घाटवळ यांच्या तालुकाप्रमुखपदाच्या काळात झालेल्या मुरूड नगरपरिषद,जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत दैदिप्यमान यश मिळवित मुरूड शहरासह तालुक्यातील भगवा फडकविण्यास सुरवात केली होती. मात्र अंतर्गत पक्षातील कलहामुळे त्यांना नाईलाजाने शिवसेनेला रामराम करीत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला होता.मात्र तेथेही त्यांचे खच्चीकरण होत असल्याने त्यांनी शेतकरी कामगार पक्षालाही दंडवत करीत बाहेर पडले.

निलेश घाटवळ सहित यामध्ये पेणचे भाजपचे नेते माजी जिल्हाप्रमुख विष्णू भाई पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ सभापती संजय जांभळे, निळकंठ ठाकुर, सुजित पाटील,प्रहार रायगड जिल्हाध्यक्ष स्वरूप घोसाळकर, प्रहार कार्यकर्ते रमेश पाटील यांसारख्या दिग्गज नेत्यांसोबत असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.त्यांच्या प्रवेशामुळे रायगडमध्ये सेनेचे प्राबल्य वाढणार आहे.
निलेश घाटवळ यांचा पक्ष प्रवेश हा आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित झाला आहे.

पक्षप्रवेश झाल्यानंतर घाटवळ यांनी सांगितले कीं येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये ह्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सेना ही नंबर एकला असेल.असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.