सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी येथील रहिवासी असणाऱ्या सरिता गजानन गायकर यांचे दु:खद निधन झाले.त्या समयी त्या सुमारे ५५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शांत,संयमी व प्रेमळ स्वभावाच्या असणाऱ्या सरिता गायकर या प्रत्येकाच्या सुख-दु:खात नेहमीच सहभागी व्हायच्या. त्यांच्या दु:खद निधनाने गायकर परिवार व तळवली ग्रामस्थ यांच्याकडून प्रचंड दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.तर त्यांच्या निधनाचे व्रुत्त समजताच त्यांचे आप्तस्वकीय, मित्रपरिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा,मुलगी,जावई व नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी शनिवार दि.७ आँगस्ट तर अंतिम धार्मिकविधी मंगळवार दि.१० आँगस्ट रोजी तळवली येथील निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.








Be First to Comment