Press "Enter" to skip to content

कोरोना महामारीचे कठिण काळात विठ्ठलवाडी विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी-राजखलाटी विद्यालयात राजखलाटी येथील सुपुत्र व सध्याचे निवास स्थान मुंबई येथे असणारे गावातील  प्रतिष्ठित नामवंत दानशूर व्यक्तिमत्व,.सुधीर मारुती मराठे तसेच त्यांचे मित्र भूषण खांडेकर व राजेश अग्रवाल यांच्या संयुक्त योगदानातून विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

संस्थेचे चेअरमन महेंद्र पोटफोडे व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सुधीर मारुती मराठे, भूषण खांडेकर राजेश अग्रवाल,संचालक लक्ष्मण धनावडे, दिलिप गायकवाड,प्रदीप निकम,रोशन बारस्कर, शैलेश शिर्के, मुख्याध्यापक अनिल खांडेकर, सहा.शिक्षक गौतम जाधव,शिल्पा मरवडे, अर्चना मरवडे, सुप्रिया जाधव,ऋषीकेश महाडिक, सुजीत लोखंडे, नितेश पोटफोडे व विद्यार्थीवर्गाचे पालक उपस्थित होते.
 

कोरोना महामारीचे कठिण काळात विद्यार्थ्यीवर्गाची शैक्षणिक गरज लक्षात घेता गोरगरीब जनतेची सेवा म्हणून मुलांचे लेखन सुधरण्यासाठी व हस्ताक्षर चांगले होण्यासाठी दुरेघी वह्या आणि इंग्रजी लेखन सुधारण्यासाठी चार रेघी वह्या उजळणीसाठी बॉक्स वह्या आणि ए फोर साईज रजिस्टर आदी बरोबर पेन ,पेन्सिल, पट्टी ,खोडरबर व प्लास्टिक पाऊच आदी शैक्षणिक साहित्याचे वाटपासह विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले.तर सुधीर मारुती मराठे तसेच त्यांचे मित्र भूषण खांडेकर व राजेश अग्रवाल यांनी शाळेत येऊन विद्यार्थी वर्गाला चांगल्या प्रतिचे शैक्षणिक वाटप केल्याने संस्था व विद्यालयाचे वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.