Press "Enter" to skip to content

सामाजिक बांधिलकी जपत होळकर परिवारातर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

महाड -पोलादपूर तालुक्यावर आलेल्या अस्मानी संकटाच्या काळात पूरग्रस्त व दरडग्रस्त लोकांच्या मदतीला सामाजिक बांधिलकी जपत होळकर परिवाराच्या माध्यमातून तसेच प्रतिक पाटील साई-पनवेल,प्रेमनाथ ठाकूर मित्र मंडळ धुतूम उरण,उत्कर्ष मित्र मंडळ टेंबिपाडा भांडुप व प्रितम चेऊलकर शाखाध्यक्ष शाखा 149 मनसे व टीम यांच्या सहकार्याने महाड तालुक्यातील नवेनगर,पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गाव गोवेले सुतारवाडी व वाकण गोपाळवाडी या गावांना किराणा सामानाचे किट व साबण,कोलगेट,खोबरेल तेल इ. बिस्किटे, मेणबत्ती किट बिसलेरी बॉक्स देऊन खारीचा वाटा उचलून आपल्या परीने एक हात मदतीचा देवुन आपले कर्तव्य बजावले आहे !

पोलादपूर तालुक्यातीलदरडग्रस्त गाव गोवेले सुतारवाडी या गावाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील सर्व लोकांशी संवाद साधून मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्ती व दरडीखाली घरे गेलेल्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होता आले. गेले 10 दिवस या गावातील सर्व कुटूंबे एकत्रितपणे सकाळ संध्याकाळ जेवणासह आपला दिनक्रम घालवत आहेत.त्यांचे हे एकीचे बळच त्यांना दुःख सावरण्याची ऊर्जा देते असे बऱ्याच ग्रामस्थांनी बोलून दाखवले. सदर दरड कोसळली ती जवळजवळ दीड ते दोन किलोमीटर अंतरावरून कोसळत आली असून 9/10 घरे जमीनदोस्त झाली आहेत.अशा परिस्थितीत होळकर परिवाराच्या माध्यमातून केलेल्या मदती बद्दल गावकऱ्यांनी आभार मानले.

नैसर्गिक आपत्ती संकटाच्या काळात होळकर परिवार कोकणवासीयां सोबत नेहमीच असेल असे मत होळकर परिवाराचे प्रमुख सामाजिक,शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे संजय होळकर गुरुजी मूळचे पोलादपूर सध्या कार्यरत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठीजुई उरण यांनी व्यक्त केले.

सोबत त्यांची पत्नी सौ. सुजाताताई होळकर,पुतण्या राजेंद्र होळकर पनवेल,सनी होळकर महाड,मुलगा सोहन होळकर व अविनाश साबळे(खडपी पोलादपूर) हे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.