सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
मुरूड तालुक्यातील भोईघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निलेश घाटवळ हे अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने लवकरच भगवा झेंडा खांद्यावर घेणार आहेत.
निलेश घाटवळ हे भोईघर ग्रामपंचायत सरपंच असताना त्यांनी मोठ्याप्रमाणात विकासकामे केली असून सामाजिक कार्यात देखील त्यांचा मोठा सहभाग आहे.निलेश घाटवळ हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते.विद्यमान आमदार महेंद्र दळवी हे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे दावेदार असताना त्यांना डावलून सुरेश टोकरे याना अध्यक्ष पद दिले.यामध्ये तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांचा प्रामुख्याने हात होता.महेंद्र दळवी याना हा अन्याय सहन न झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास राम राम करीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.त्याच्याबरोबरोर राष्ट्रवादी पक्ष सोडून शिवसेनेत जाणाऱ्या सहकार्यामध्ये निलेश घाटवळ देखील होते.
निलेश घाटवळ हे मुरूड तालुका प्रमुख असताना त्यांनी महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड नगरपालिका ही शिवसेनेकडे आणण्यात यश मिळविले.तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत देखील सर्वपक्षीय आघाडी असताना त्यांनी उसरोली जिल्हा परिषद गटात महेंद्र दळवी,प्रशांत मिसाळ यांच्या सहकार्याने दोन पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले तसेच पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकविला होता.मात्र शिवसेनतेतील अंतर्गत वादविवादामुळे त्यांनी शिवसेनेला राम राम करीत शेकाप मध्ये प्रवेश केला होता.मात्र तिथेही त्यांचा शेकाप नेत्यांकडून खच्चीकरण करण्यात येत असल्याने त्यांनी त्या पक्षाही राम राम केले होते.गेले काही महिने ते राजकारणापासून दूर गेले होते. मात्र आमदार महेंद्र दळवी यांच्या कामाच्या पध्दतीने पुन्हा ते शिवसेनेत येण्याची इच्छा त्यांनी आमदार यांना बोलवून दाखविले होते.
निलेश घाटवळ हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने लवकरच भगवा पुन्हा खांद्यावर घेत शिवबंधन हातावर बांधून घेणार आहेत.








Be First to Comment