बांधकाम विभागाने तातडीने काशीद पुलाचे काम केल्याने त्यांना धन्यवाद द्यावे तितके कमी :- आमदार महेंद्र दळवी
सिटी बेल | मुरूड | अमूलकुमार जैन |
मुरूड तालुक्यातील काशीद पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी मुसळधार पाऊस असताना देखील पुलाचे उत्कृष्टरित्या पूर्ण केले असल्याने त्यांना शासनाच्या वतीने त्यांना धन्यवाद देऊ तितकेच कमी आहे असे प्रतिपादन अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी काशीद पूल उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमात केले.
यावेळी मुरूड पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत मोहिते,उसरोली गटाच्या रायगड जिल्हा परिषद सदस्या राजश्री मिसाळ, उपजिल्हाप्रमुख तथा कोर्लई सरपंच प्रशांत मिसाळ, मुरूड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर,अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी,महिला तालुका संघटक शुभांगी करडे,जगीता कोटकर-हासपाटील,भरत बेलोसे,संतोष राणे,विजय शिंदे,नरेश कुबल,मनोज कमाने,निलेश घाटवळ,कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगीरथ पाटील,अजय सोडेकर,बोर्ली शाखाप्रमुख भारत मोती,स्वप्नील रामनाखवा,अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

काशीद पूल उद्घाटनप्रसंगी आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले की,11जुलै 2021रोजी मुसळधार पावसामुळे काशीद पूल दुर्घटना घडली होती.ही घटना दुर्देवी होती.या दुर्घटनेमध्ये एकाचा निष्पाप बळी गेला होता.सदर पूल दुर्घटनेमुळे बोर्ली-मांडला विभागातील नागरिकांचा मुरुडचा संपर्क तुटला होता.त्यांना मुरूड येथे जायचे असेल तर जवळपास चाळीस किलोमीटरचा वळसा मारून सुपेगाव खिंडीतुन मुरूड येथे जावे लागत होते. तशीच अवस्था ही मुरुडकारांची देखील झाली होती.
सदर पुलाचे काम तातडीने करण्यात यावे अशी सूचना शासनाच्या वतीने अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते.त्यानुसार त्यांनी तत्परतेने पूर्ण करीत उत्कृष्ट काम पुलाचे केले आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने त्यांना धन्यवाद जितके देऊ तितकेच कमी आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.








Be First to Comment