Press "Enter" to skip to content

रोहा तामसोली ग्रामस्थांच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू देऊन मदतीचा हात

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड पोलादपूर येथे झालेल्या पूरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले घरात साठवून ठेवले समान सुमान सारे वाहून गेले. त्याना आता सर्व स्तरातून मदत पोहोचत आहे.

याचाच एक भाग म्हणून रोहा तालुक्यातील तामसोली ग्रामस्थ महिला व युवक मंडळ यांनी एकत्रितपणे प्रत्येक घरातून सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कोणी तांदूळ कोणी गहू कोणी कडधान्य तर कोणी नवं नवे कपडे तर काही वस्तू स्वरूपात व काही पैशा स्वसरूपात मदत गोळा करत पूरग्रस्तांना आधाराची साथ मदतीचा हात ही भावना मनात निर्माण करत टेम्पो भरून शंभरहून अधिक किट तयार करत तेथील कुटूंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सर्व ग्रामस्थ नागरिकांच्या मदतीने करण्यात आले.

महाड शहरासह ,तसेच परिसरातील भागात पूरपरिस्थितीत व्याकुळ झालेल्या कुटूंबाना ग्रामस्थ ग्रामस्थ नागरिकांच्या वतीने पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवण्याचे ठरवले.यासाठी महाड करांवर उद्धभलेली परिस्तिथी लक्षात घेऊन सर्व ग्रामस्थ महिला व युवक मंडळ एकत्रित येत एकच दिवसातशंभरहून अधिक कुटूंबियांना पुरेल असे जीवनावश्यक वस्तूंचे किट तयार करत त्यामध्ये पाणी बोटल्स,तांदूळ,आटा, मसाला,साखर, मूग,चणे, चहा पावडर, बिस्किटस, साबण अंगाचे आणि कपड्याचे, डेटाॅल, औषधे तूर डाळ, मूग डाळ,अन्नधान्य
अधिक वस्तूंचा समावेश करत हे किट तयार करून पूरग्रस्तांना घरपोच तामसोली ग्रामस्थांकडून मदत करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.