सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
एक हात कर्तव्याचा अपील करत माजी नगरसेविका उर्मिला रवींद्र देवकर यांनी महाड येथील पूरग्रस्त तलिये गावात जाऊन जीवनावश्यक वस्तू व साहित्याचे 50 किट(1 किट — तांदूळ, साखर, चहा पावडर, साबण, बिस्कीट, दाल, फरसाण पाकिटे, पाणी बॉटल), ई चे वाटप करत एक हात कर्तव्याचा ही मोहीम राबवली.
पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी, उभे राहण्यासाठी, सहवेदना व्यक्त होण्यासाठी, माणुसकी जपण्यासाठी चला साथ देऊया अन माणूस बनवूया. असे उर्मिला रवींद्र देवकर यांच्या आवाहनास सोबत असणारे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेली त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रविंद्र परशुराम देवकर, सुदाम शिंदे ,डॉक्टर खराडे ,अरुण जाधव, गणेश नागे, नितेश देवकर आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment