Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषदेच्या वतीने पूरग्रस्तांना भरीव मदत : ११०० जीवनाश्यक किट चे वाटप

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

दि. 21 जुलै व दि. 22 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे कर्जत शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, महापुरात आपलं सर्वस्व गमावलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी कर्जत नगरपरिषदेची भरीव मदत करण्यात आली असून पूरग्रस्तांना मदत म्हणून संसार उपयोगी वस्तू व किराणा सामान वाटप करण्यात येत आहे.

अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील नद्यांनी आपली पातळी ओलांडली, तालुका जलमय झाला, कर्जत शहराच्या मध्यभागातून वाहणारी उल्हास नदी मध्यरात्री नंतर उलटली आणि काही कळण्याच्या आतच शहराच्या बाजारपेठ, कर्जत न्यायालय परिसर, इंदिरानगर, कोतवाल नगर मधील म्हाडा कॉलनी, विठ्ठलनगर मधील सत्यम अपार्टमेंट,निलेश अपार्टमेंट,चंदन अपार्टमेंट, मुद्रे येथील शिवम कॉम्लेक्स, नेमिनाथ रेसिडन्सी, सिद्धार्थ नगर ज्ञानदिप सोसायटी या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले, त्यामुळे घरातील वस्तू पाण्यावर तरंगू लागल्या, घरातील धान्य, सोफे, गाद्या भिजल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.महापूर आला त्या दिवशी पोह्याचा नाश्ता आणि दुपारचे जेवण नगर परिषदेच्या माध्यमातून देण्यात आले होते.

कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी व त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक, नगरसेविका यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात म्हणून आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत योग विद्या प्राणिक हिलिंग फाऊंडेशन महाराष्ट्र, रेडीएन्ट हिलिंग ग्रुप, ईगल ब्रिग्रेड फाऊंडेशन, मधुरता, अमेय प्रधान परिवार आणि मित्र यांनी तसेच कर्जत मधील दुकानदार पारस क्लॉथ स्टोअर्स, रुपम ड्रेसेस, नागरिक केतन भाई शहा, रेखा कांबळे तर अखिल महाराष्ट्र शिव कामगार सेना तसेच वैयक्तिक नागरिकांनी नगरपरिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मदत केली.

नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी नियोजन करून त्या- त्या प्रभागातील नगरसेवक, नगरसेविका यांना बरोबर घेवून जीवनावश्यक वस्तूचे किट तयार करताना त्यामध्ये काही कमी असेल तर अनंत काका जोशी प्रतिष्ठान तर्फे ते सामान खरेदी करून किट मध्ये टाकले व सध्याच्या परिस्थितीत लागणारे किट तयार केले.

नगरपरिषद क्षेत्रातील संजय नगर मध्ये 60 किट, किराणा सामान जीवनावश्यक वस्तू किट, शिवाजीनगर 30 किट, किराणा सामान जीवनावश्यक वस्तू किट, बामचा मळा 90 किट, किराणा सामान जीवनावश्यक वस्तू ,कपडे, लहान मुलांचे कपडे, टॉवेल ,चादर ,बेडशीट बेबी फूड आदी,भैरवनाथ नगर किट, किराणा सामान कपडे जीवनावश्यक वस्तू आदी, आमराई 130 किट, किराणा सामान जीवनावश्यक वस्तू चादरी आदी, स्वप्ननगरी जवळील वाडी मुद्रे परिसर 54 किट, किराणा सामान जीवनावश्यक वस्तू कपडे टॉवेल आदी, कोतवाल नगर 74 किट, किराणा सामान जीवनावश्यक वस्तू इत्यादी किट, म्हाडा कॉलनी 25 किट, किराणा सामान जीवनावश्यक वस्तू किट, उद्मम नगर, गुंडगे परिसर 65 किट,किराणा सामान जीवनावश्यक वस्तू किट, इंदिरानगर 230 किट, किराणा सामान जीवनावश्यक वस्तू किट बेडशीट सॅनिटरी नॅपकिन्स आदी, पंचशील नगर 45 किट,किराणा सामान जीवनावश्यक वस्तू किट,धापया महाराज परिसर 16 किट,किराणा सामान जीवनावश्यक वस्तू, भिसेगाव, एसटी स्टँड परिसर, आंबे भवानी मंदिर परिसर 35 किट, किराणा सामान जीवनावश्यक आदी, भिसेगाव वाडी 64 किट, किराणा सामान जीवनावश्यक वस्तू आदी, क्रांतीनगर फातिमानगर 150 किट, किराणा सामान जीवनावश्यक वस्तू आदी अश्या 1 हजार 98 किट चे वाटप करण्यात आले.

हे किट वाटप करताना त्या त्या प्रभागातील नगरसेवक, नगरसेविका यांनी सहकार्य केले असे नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी आवर्जून सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.