सिटी बेल | गोवे -कोलाड | विश्वास निकम |
महाड,बिरवाडी पोलादपूर भागात पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती अशा पुरग्रस्तांना संपूर्ण राज्यातून विविध पक्ष ,संघटना , सामाजिक मंडळ,संस्थाच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. काही सांप्रदायिक मंडळांनी स्वच्छतेचे काम हाती घेतले.
याचधर्तीवर एक सामाजिक बांधिलकी म्हणून माणगाव तालुक्यातील प्रामुख्याने माणगाव शहरात संपूर्ण रायगड जिल्ह्यातून विविध व्यवसाय ,नोकरी निमित्त रहिवाशी असलेल्या आगरी समाज माणगाव विभाग शैक्षणिक ,सामाजिक विकास मंडळाच्यावतीने महाड व बिरवाडी भागातील पुरग्रस्तांना त्यांची आत्ताची गरज ओळखून ब्लॅंकेट व
चटईचे वाटप करण्यात आले.
हे वाटप करत असतांना पुरग्रस्त पिडीत बांधवांची चौकशी करून त्यांना भावनिक आधार दिला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष मेघना भगत,सचिव गजानन पाटील ,सल्लागार राजाराम जांभळे, राजन पाटील, काशिनाथ गाणेकर, राजेंद्र भगत , हनुमान म्हात्रे ,शिवाजी म्हात्रे ,संजय भोईर, शशिकांत म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment