Press "Enter" to skip to content

आपटा फाटा ते दांड फाटा रस्ता बनला मृत्यू चा सापळा

सिटी बेल | रसायनी |

आपटा फाटा ते दांड फाटा रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे . कंत्राटदाराने केलेलं नित्कृष्ठ दर्जाचे काम व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारा मूळे अनेक खड्डे महत्त्वाच्या ठिकाणी पडले आहेत.मुसळधार पावसामुळे खड्डयात पाणी भरपूर प्रमाणात साचत असल्याने दुचाकी अथवा चारचाकी वाहन चालवताना तारांबळ उडत असते . रस्त्यावर ग्रीट अनेक ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे अनेक वाहन घसरून अपघात घडत असतात , चारचाकी वाहन चालवत असताना खड्डे चुकवीत असताना वाहनांची टक्कर पाहायला मिळते .

रसायनी चौक , पराडे कॉर्नर , चांभार्ली ,मोहोपाडा , आपटा अश्या बाजारपेठ ठिकाणी रस्त्याची दुर्दशा झाली आहे , या कारणास्तव वाहतूक कोंडी ची समस्या अपघाताच प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत .वेळीच दखल घेऊन रस्त्याची डागडुजी केली नाही तर अपघाती मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही .

रस्त्याच्या दुतर्फा अनेक मोठं मोठी झाडे आहेत , पावसाळ्यात सोसाट्याचा वारा येऊन अनेक झाडे तुटली जातात , झुडुपांचे प्रमाणे सुध्दा अनेक ठिकाणी पाहायला मिळत , त्यांची कापणी सुध्दा २०२१ ह्या साला मध्ये झालेली नाही .अश्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्या ने प्रवाशी , रिक्षा चालक , खाजगी वाहन धारकांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे .

सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लवकरात लवकर दखल घेऊन ह्या सर्व समस्येवर तोडगा काढावा . नाही तर युवासेना खड्ड्यात बसून आणि बसवून रस्ता रोको आंदोलन करेल असा इशारा युवासेनेचे केळवणे जिल्हा परिषद अधिकारी कु.स्वप्नील सुरेश भोवड यांनी माध्यमा द्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग भिंगारी यांस दिला आहे .

त्याचप्रमाणे कंत्राटदार यांच्या कामाची तपासणी करून चौकशी व्हावी असं निवेदन मुख्यमंत्री उध्दव जी ठाकरे व रायगड जिल्हाधिकारी यांस दिले आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.