Press "Enter" to skip to content

भाजपच्या चित्रा वाघ यांनी कर्जत मध्ये पूरग्रस्त भागाची केली पाहणी

पूरग्रस्त लोकांना तात्काळ पूरग्रस्त दाखले देण्याचे नगरसेवकांना केले आवाहन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

दि. 21 जुलै व दि. 22 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या परिसराची पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या कर्जत मध्ये आल्या होत्या.

अतिवृष्टीमुळे अनेक सखल भागात पावसाचे पाणी साठले होते अचानक आलेल्या पुरामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरात पाणी शिरल्याने घरातील अनेक मौल्यवान वस्तू खराब झाल्या तसेच घरातील अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात भिजल्याने नासाडी झाली. काही लोकांचे कपडे, सोफे, शासकीय कागदपत्रे, तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची अक्षरशः माती झाली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेत आज महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी कर्जत मध्ये येवून विविध भागांची पाहणी केली. नागरिकांना यावेळी धीर देत नगरसेवकांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन करण्यात आले.

विठ्ठल नगर परिसरातून सुरुवात करत मनोहर कडू यांच्या घरापासून पाहणी दौरा सुरू करण्यात आला आणि प्रत्येक पूरग्रस्तांच्या घरी जात चौकशी करण्यात आली. विठ्ठल नगर परिसरातून पाहणी केल्यानंतर मुद्रे येथील घरांमध्ये जात तेथील घरांमध्ये पाहणी केली . यावेळी स्थानिक नगरसेवक यांना पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. सोबतच या पूरग्रस्तांच्या घरातील शासकीय कागदपत्रे व इतर वस्तूंचे नुकसान झाले असल्यास त्यांना तत्काळ पूरग्रस्त दाखले काढून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. गरजूंना राहण्यासाठी तात्पुरता निवारा तसेच गरजुंची भूक भागविण्यासाठी कम्युनिटी किचन चालू करून देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर शनी मंदिर आमराई परिसरात भेट दिल्यानंतर दहीवली परिसराची पाहणी करण्यात आली. सर्व पूरग्रस्तांसाठी सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन देत त्यांनी पाहणी दौरा संपवला.

यावेळी कोकण किसान मोर्चा चे संपर्क प्रमुख सुनील गोगटे, तालुका सरचिटणीस राजेश भगत, तालुका सरचिटणीस संजय कराळे, कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, तालुका महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा गोगटे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील, युवा मोर्चा शहर अध्यक्ष मयूर शितोळे,युवा मोर्चा सरचिटणीस संदेश कराळे, जिल्हा महिला महिला मोर्चा चिटणीस बिनिता घुमरे, शहर महिला मोर्चा अध्यक्ष सरस्वती चौधरी, कर्जत तालुका मीडिया सेलच्या गायत्री परांजपे, कर्जत तालुका शहर सरचिटणीस प्रकाश पालकर, कर्जत नगरपालिकेच्या नगरसेविका स्वामिनी मांजरे, विशाखा जिनगिरे, सुषमा ढाकणे, मनिषा ढुमणे, समीर सोहनी, शर्वरी कांबळे,स्वप्ना सोहनी, मिलिंद खंडागळे, अभिनय खांगटे, सुर्यकांत गुप्ता, सर्वेश गोगटे, सोनाली अथणीकर, मंगेश भोईर, विजय जिनगिरे, मारुती जगताप, रायगड जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणीस संतोष भोईर, राहुल कुलकर्णी, सुप्रिया भगत आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

पूरग्रस्त भागाची पाहणी करताना चित्रा वाघ सोबत कर्जत मधील भाजपचे पदाधिकारी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.