Press "Enter" to skip to content

वेध गणरायाच्या अगमनाचे, कोरोनाच्या सावटातहीमूर्तीकारांची लगबग

श्री गणेश कला स्टुडिओ तुपगांव येथे विविध रूपांतील बाप्पाच्या मूर्ती तयार, ३० टक्के मूर्ती बुकिंग

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

गणरायाच्या अगमनासाठी सव्वा महीन्या चा कालावधी असताना,श्री.गणेश कला स्टुडिओ तुपगांव( चौक ) येथिल भगवान महाराज आपटेकर,मुकेश आपटेकर यांच्या कारखान्यात कारागीर गणराची मूर्ती घडविण्यांची लगबग सुरु झाली असून,भक्ताच्या मागणी नूसार विविध प्रकारचे रंग देण्याची सुरुवात झाली आहे. गणपती उत्सव सप्टेंबर महिन्यात येत असलेल्या गणपतीची उस्तुकता बाळ गोपाळांना लागली आहे.यामुळे गणोशोत्सवासाठी आकर्षक मूर्त्या बनवण्यात मूर्तीकार मग्न झाले आहेत.

ह्या कारखान्यातील गणेश मुर्ती अरब,कत्तार देशात सुद्धा विक्री झाल्या आहेत. मात्र दोन वर्षापासून असलेल्या कोरोनांचे सावट मुळे सध्या बंद आहे.या कारखान्यास अर्ध शतक पुर्ण झाले आहे, दोन महिने आधीच,तर काही ठिकाणी वर्षभर गणपतीच्या मूर्त्या घडविल्या जात आहेत.काही पेणहून कच्च्या मूर्त्या आणून आपल्या कारखान्यात रंगवण्याचे काम केले जात आहे. सध्या मूर्तीकार मूर्त्यांना रंगविण्याच्या कामात मग्न असून मूर्त्यांची बुकींगही मोठ्याप्रमाणावर सुरु झाली आहे.६ इंच पासून २ फूटाच्या मुर्ती पासून एक फुटाच्या मुर्तींना खूपच मागणी असल्यामूळे जवळ – जवळ ३० टक्के मूर्त्या बुकिंग झाल्या असून भक्ताच्या इच्छा नुसार मुर्ती घडविण्यात येत असून मागणी नुसार कलर्स दिले जात आहे.

विविध ठिकाणच्या गणेशमूर्ती कारखान्यात तयार झाल्या असल्यामूळे या बाप्पाना पाहताच येथिल वातावरण मंगलमय होण्यास सुरुवात झाली आहे,असे गणेश भक्तांना जाणवू लागले आहे.यावर्षी दगडूशेठ,अदि गणेश,वरद हस्त,सिंगल लोड,शिवरेकर वेलिंग,टिटवाळा,लालबागचा राजा अदि मुर्ती घडविल्या जात असल्यांचे राहुल गायकवाड,ओमकार गुरव,महेश शिंदे,नयना साळवी,गौरव गुरव,पुजा गुरव, अदि ने प्रतिनिधी शी बोलतांना व्यक्त केले.



Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.