Press "Enter" to skip to content

माथाडी कामगार संघटनेच्या वतीने महाड येथे श्रमदान

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रेरणेने तसेच रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या महाड परिसरात महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटना नागोठणे तालुका रोहा यांच्या वतीने श्रमदान करून माथाडी कामगार संघटनेनेच्या कामगार वर्गाने सामाजिक बांधिलकी निभावली. दरम्यान यापुढे ज्याठिकाणी काही अडचण असेल तेथे जेव्हा आमची गरज लागेल तेव्हा आम्ही त्याठिकाणी हजर राहून जनसेवा करू अशी भावना माथाडीच्या कामगार वर्गाने व्यक्त केली.

महाड येथील श्रमदान प्रक्रियेत माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष गायकवाड, उपाध्यक्ष दिनेश घाग, सुनील लाड, सुरेश बडे, अर्जुन निरगुडे, राजेश निरगुडे, सुनील पिंगळे, मोहन पिंगळे संतोष शीद, किरण शीद, चंद्रकांत शीद, राजेश पिंगळे, जणू पिंगळे, अशोक पिंगळे आदींनी सहभाग घेतला होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.