Press "Enter" to skip to content

मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांचा कार्याचा करिष्मा कायम

जिल्हा संघटिका रेखा ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थिती पनवेल-उलवे नोड मधील महिला भगिनींचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी कोरोना महामारीत केलेल्या सामाजिक कार्य, आरोग्य विषयक कार्य व रक्तदान शिबिरे आशा विविध कार्याने प्रभावित होऊन रविवार दिनांक ०१ ऑगस्ट २०२१ रोजी सौ.सोनल मनोज घरत व रुखसार कापडी यांच्या प्रयत्नाने उलवे नोड मधील महिला कार्यकर्त्यानी जिल्हाप्रमुख कार्यालय येथे जिल्हा संघटिका रेखाताई ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थिती पूनम खराडे, स्वप्नाली पुजारी, सुजाता बुरी, आशा पडलकर, शीलम हुंडाल, सुरेखा मोरे, अर्चना गुडेकर, यांनी आपल्या कुटूंबियांसहित शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार श्री.मनोहरशेठ भोईर यांनी सर्व प्रवेश कर्त्यांना भगवी शाल व शिवबंधन बांधून सर्व भगिनींचे शिवसेनेत स्वागत केले.

या प्रसंगी उरण विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, उपतालुकाप्रमुख अमित भगत, शहरप्रमुख मनोज घरत, उपजिल्हासंघटिका ममता पाटील, विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, पनवेल तालुका महिला संघटीका मेघा दमडे, उरण तालुका महिला संघटिका भावना म्हात्रे, शहर संघटिका मेघा मेस्त्री, तालुकासंपर्कप्रमुख प्रणिता म्हात्रे, उरण संपर्क संघटिका श्रद्धा सावंत, उरण संपर्क संघटिका वंदना पवार, उपशहरसंघटिका माधुरी चव्हाण, महिला उपतालुका संघटिका पनवेल संगीता संजय भंडारकर, उपसरपंच वावेघर श्रुती माळी, गुळसुंदे महिला संघटिका नुतन पाटील, शिवसैनिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.