सिटी बेल | नागोठणे |
नागोठण्याजवळील कोंडगाव (ता.रोहा) येथील रहिवासी व ज्येष्ठ नागरिक गोपाळ रामजी गिजे (वय ७५) कोंडगाव येथीलच त्यांच्या राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर कोंडगाव येथील वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे आप्तेष्ट, सगे-सोयरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कै. गोपाळ गिजे यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा नरेश गिजे, दोन विवाहित मुली सौ. विद्या संतोष ठाकूर व सौ. विमल विनोद आवाद, सुन, जावई, नातंवडे यांच्यासह मोठा परिवार आहे.
दिवंगत गोपाळ गिजे यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ व मनमिळाऊ होता. आपल्यापेक्षा वयाने लहान-मोठ्या असलेल्या सर्वच व्यक्तींचा ते आदर करीत असत. कोंडगाव मधील विविध सामाजिक व धार्मिक कार्यात ते नेहमीच हिरीरीने भाग घेत असत. त्यामुळे कै. गोपाळ गिजे यांच्या निधना बद्दल कोंडगाव व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कै. गोपाळ गिजे यांचे दशक्रिया विधी गुरुवार दिनांक ५ आॅगस्ट रोजी कोंडगाव येथे नदी किनारी तर उत्तरकार्य दिनांक ८ आॅगस्ट रोजी कोंडगाव येथील त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याचे गिजे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.








Be First to Comment