सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
२२ जुलै रोजी आलेल्या महापुरा मुळे महाड व पोलादपुर तालुक्यात भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. गेली ९ दिवस रायगडचे खासदार शसुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्यामाध्यमातून सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम, अन्नधान्य वाटप, मेडिकल कॅप, पंचनामे आदि कामांचे नियोजन करून पूरग्रस्त महाड व पोलादपूर तालुक्यात मोलाची मदत करण्यात आली.
महाड शहरात मोठ्या प्रमाणात चिखलाचा मलबा असल्यामुळे व स्वच्छतेच काम सुरू असल्या कारणाने तेथील मदत पोहोचविण्याच नियोजन शनिवारी करण्यात आले होते. जवळ जवळ संपुर्ण महाड शहरात २८ भागात २५० ते ३०० सहकार्यां सोबत या मदत वाटपाचे नियोजन करण्यात आले. पूरग्रस्त भागात साधारणतः ५ हजार किटचे वाटप करण्यात आले असून जीवनावश्यक सर्वच गोष्टींचा या किट मध्ये समावेश होता.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, पालकमंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा गिताताई पालरेचा उपस्थित होते. यावेळी रुपालीताई चाकणकर यांनी सुध्दा महाड वासीयांसाठी मदत उपलब्ध करून दिल्या बद्दल समस्त महाड वासीयांच्या वतीने आमदार अनिकेत तटकरे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.








Be First to Comment