Press "Enter" to skip to content

गावंड परिवार धावले पुरग्रस्तांच्या मदतीला

सिटी बेल | आवरे | साईनाथ गावंड |

आवरे गावातील थोर साई भक्त आणि प्रतिष्ठित नागरिक स्वर्गीय रामदास गवत्या गावंड यांच्या नावाने रा. ग .गावंड ही जी संस्था कार्यरत आहे. गेली अनेक वर्षे सामजिक उपक्रम राबवित आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिन भुकेला दिसता कोणी घास मुखीचा मुखी घालुनी या वाचना प्रमाणे बुडत्याला काडीचा आधार हा खूप खूप भारी असतो. पोलादपूर पूरग्रस्तांसाठी रा.ग.गावंड कला क्रीडा शैक्षणिक व सामाजिक संस्था आवरे उरण यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी खारीचा वाटा उचलण्याचे काम केले आहे‌ जवळ जवळ 500 ते 600 मेणबत्त्यांचे बाॅक्स चा पुरवठा करण्यात आला आहे‌‌.

ही मदत जरी कमी वाटत असली तरी या पूरग्रस्तांसाठी फार मोठी आहे कारण परिस्थिती तशीच आहे . आठ ते दहा दिवस उलटून गेले तरी त्या ठिकाणी वीज पुरवठा झालेला दिसून येत नाही आणि अजून आठवडाभर सुद्धा ते पूर्ण होईल याची शाश्वती नाही असे चित्र या महापुरामुळे निर्माण झाले आहे पोलादपूरच्या ग्रामसेवक संघटना यांच्याशी चर्चा करून त्यांच्या सूचनेनुसार ही मदत पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

स्वर्गीय रामदास गवत्या गावंड हे हयात असताना त्यांची समाजसेवेची ओढ नेहमीच असे त्यांचा हा वारसा यापुढे चालावा या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली संस्थेकडून व त्यांच्या मुलांकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात तसेच नातू, पणतू, जावई यांनीही यात सहभाग दर्शविला. आई-बाबांचा हा संस्कार कळत नकळत आमच्या गावंड परिवारावर झाला आहे. अशीच मदत आम्ही आमच्या परीने समाज कार्यात नेहमी करत असतो पुरग्रस्तांना मदत ही काही मोठी गोष्ट नाही पण जेव्हा जेव्हा अशी संकटे येतात तेव्हा त्या ठिकाणी अशा मदतीचा खारीचा वाटा सुद्धा मोलाचा ठरतो. अशाच प्रकारचा मदतीचा हात आम्ही नेहमी करत असतो पुढे पण करीत राहू अशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष सन्मानीय श्री संदीप गावंड यांनी दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.