Press "Enter" to skip to content

नरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध विकास कामांचे भूमिपूजन

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

खालापूर तालुक्यातील असलेल्या गावामध्ये आज विकास कामाचे भूमिपूजन सोहळा रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस सरचिटणीस नरेश पाटील यांच्या जन्म दिनांचे औचित्य साधून पार पडण्यात आले.यावेळी माजगांव येथिल आर सी सी गटार बांधकाम,माजगांव गणेश घाट इसांबे येथिल गणेश घाट,लोहोप येथिल साभामंडप अश्या विविध झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या सेज फंडातून विकास कामे आज आनावरण आणी भूमिपूजन सोहळा संपन्न करण्यात आले.

नागरिकांना होत असलेल्या समस्या विचारांतून घेत असतांना ही विकास कामे करण्यात आली होती.गाव तेथे गटार असाणे गरजेचे आहे.यामुळे रस्त्यावर पाणी झाल्यास विविध आजार निर्माण होत असतात.मात्र तसे होवू नये यासाठी या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा करण्यात आले त्याच विविध घाट सभामंडप अदि चे अनावरण करण्यात आले.

यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य पद्मा सुरेश पाटील, सुरेश पाटील, उपसभापती विश्वनाथजी पाटील, संतोषजी बैलमारे, ग्रूप ग्राम पंचायत माजगांव सरपंच गोपीनाथजी जाधव, सूर्याजी भाऊ पाटील,किशोर पाटील,नंदू पाटील,हरीश पाटील,संदिप पाटील,अविनाशजी कांबळे,जयवंत पाटील, चंद्रकांत पाटील विलास कांबळे,कृष्णा पाटील, योगेश ढवालकर,व नामदेव वाघे व सर्व जेष्ठ तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.