सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर आणि आजूबाजूच्या परीसरातील जनता पुराच्या धक्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकांचा धीर खचलेला आहे, हतबल झालेले नागरिक आता एक मेकांना धीर देत आहेत.पण डोळ्यातील चमक मात्र तशीच आहे, ही त्याचीच ग्वाही आहे की मी पुन्हा भरारी घेईन.पुराच्या पाण्याने सर्वकाही हिरावून घेतले मोठी आपत्ती रायगड वाशीयांवर निर्माण झाली अनेक घरे उध्वस्त झाली त्यात महाड येथील तळीये गाव दरडीमुळे पूर्णतः भुईसपाट झाले यात अनेकांनाचा जीव गेला. काही बाहेर राहिले ते बचावले परंतु त्यांच्या डोळ्यातील अश्रू आज देखील भयावह घटना सांगून जात आहे अश्रुंचे पाट वाहत आहेत,या दुःखमय घटनेची जाणीव व सामाजिक बांधिलकी म्हणून प्रमुख मार्गदर्शक लायन रवींद्र घरत व पराग फुकणे यांच्या मार्गदर्शनातून लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा च्या वतीने महाड तळीये येथील दरडग्रस्त ठिकाणी जाऊन त्यांना आधाराची साथ मदतीचा हात देत त्यांचे सांत्वन करत देवाज्ञा झालेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत तसेच तेथील प्लास्टिक पाण्याच्या रिकाम्या बाटल्या पाला पाचोळा कचरा याची स्वछता करत नैतिक कर्तव्य समजून मदतकार्य करत दरडग्रस्त व महाड परिसरात पूरग्रस्तांना लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा च्या माध्यमातून पन्नास हजाराहून अधिक रक्कमेच्या जीवनावश्यक व विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा यांच्या सर्व लायन सद्स्य यांच्या सहकार्याने तळीये गाव ,महाड शहरातील काकडतळे,गुजर आली, कोटेश्वरी तलाव,कुंभारवाडा, परिसरातील जिवनावश्यक वस्तूंचे किट, लहान मुले, महिला व पुरुषांचे कपडे, साड्या, टॉवेल, ब्लॅंकेट,चादर,मेणबत्ती, माचीस बॉक्स, मच्छर अगरबत्ती,पिण्याचे पाणी मेडिसिन टूथपेस्ट ब्रश साबण असे साहित्याने भरलेली टेम्पो वाहने महाड तालुक्यात नेऊन तेथील पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.तसेच सर्व प्रकारच्या जिवनावश्यक वस्तूं पूरग्रस्तांना वाटप केल्या.
लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा चे अध्यक्ष डॉ सागर सानप,उपाध्यक्ष प्रा माधव आग्री,नरेश बिरगावले,डॉ मंगेश सानप,सेक्रेटरी रवींद्र लोखंडे ,खजिनदार श्याम लोखंडे,लायन अनिल महाडिक,अलंकार खांडेकर,नंदकुमार कलमकर,राजेंदर कोप्पू, गजानन बामणे,डॉ विनोद गांधी,डॉ प्रदीप शिंपी,किशोर कडू,गणेश बागुल,दिनकर सानप ,विश्वास निकम ,आदी सर्व लायन सदस्य यांनी अर्थसहाय्य मदत करत हातभार लावत सदरील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा म्हणून मदत करण्यात आली.








Be First to Comment