Press "Enter" to skip to content

शिवसेना पक्षाच्या उरण विधानसभा संपर्कप्रमुख पदी महादेव घरत

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

शिवसेना रायगड जिल्हासंपर्क प्रमुख दत्ताजी दळवी, रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना पक्षाच्या उरण विधानसभा संपर्कप्रमुखपदी महादेव घरत यांची नियुक्ती करण्यात आली.

आपण शिवसेना पक्षाच्या ध्येय धोरणाना अनुसरून वाटचाल करून शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी, पक्ष बांधणीसाठी आणि विस्तारासाठी नेहमीच प्रयत्नशील राहावे. अशा शुभेच्छा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी यावेळी दिल्या.

यावेळी महिला जिल्हा संघटिका रेखाताई ठाकरे, उपतालुकाप्रमुख अमित भगत, शहरप्रमुख मनोज घरत, उपजिल्हासंघटिका ममता पाटील, उरण तालुका महिला संघटिका भावना म्हात्रे, शहर संघटिका मेघा मेस्त्री, उरण संपर्क संघटिका श्रद्धा सावंत, उरण संपर्क संघटिका वंदना पवार, उपशहरसंघटिका माधुरी चव्हाण, शाखाप्रमुख सचिन पाटील व शिवसैनिक उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.