मासळी खरेदीसाठी करंजा गावात ग्राहकांची गर्दी ; कोरोनाचे नियम धाब्यावर
सिटी बेल | उरण | प्रतिनिधी |
पावसाळी मासेमारीस बंदी संपण्यास काही दिवसांचा अवधी असताना व कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसुवन सायंकाळी उरण करंजा परिसरात मासळी खरेदी करण्यासाठी जिल्हा व परजिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने ग्राहकांची गर्दी होत आहे. तर वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूक कोंडीचा सामना ग्रामस्थांना करावा लागत होता. याबाबत प्रशासन काय कारवाई करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासन व प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असतानाही व मासेमारी बंदीचा कालावधी संपण्याआधीच उरण करंजा येथे जेट्टीवर मासेमारी खरेदीसाठी मुबंई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिक आपली वाहने घेऊन आली आहेत.

या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नसून वाहने ही वेडीवाकडी लावल्याने गावात वाहन कोंडी होत आहे. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने याप्रकरणी शासन व प्रशासन काय भूमिका घेऊन कारवाई करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.








Be First to Comment