सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
उरण तालुका आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी तसेच विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दिघोडे येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संघटनावाढी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात बुथ कमिटी तयार करण्यासंबंधी चर्चा झाली. तसेच पक्षाच्या विविध सेलना बळकटी देण्यासंबंधी प्रत्येक सेलच्या प्रमुखासोबत संवाद साधला.

या बैठकीला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस व पनवेल निरिक्षक सौ भावनाताई घाणेकर, प्रशांत पाटील, उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष अॅड. भार्गव पाटील, जिल्हा सरचिटणीस पुखराज सुथार, जिल्हा सरचिटणीस दिपक माळी, शहर अध्यक्ष गणेश नलावडे, तालुका अध्यक्ष मनोज भगत, युवक अध्यक्ष कैलास भोईर, कार्याध्यक्ष रमण कासकर, संघटक प्रदीप तांडेल जिल्हा युवक उपाध्यक्ष समाधान म्हात्रे महिला तालुका अध्यक्ष हेमांगीताई पाटील तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment