Press "Enter" to skip to content

शिवसेना उरण तालुका व शहराच्या वतीने महाड-पोलादपूर पूरग्रस्तांसाठी मदत

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर तालुक्यातील अनेक गावे उध्वस्त झाली असून अनेक ठिकाणी अन्य-धान्य जीवनावश्यक वस्तु यांची खुप आवश्यकता आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले आहे. त्यांच्या आदेशाचे पालन करत, शिवसेना उरण तालुका व शहराच्या वतीने महाड-पोलादपूर पूरग्रस्तांसाठी मदत पाठविण्यात आली आहे.

यामध्ये तांदूळ, गहू, साखर, तेल, चहा व दुध पावडर, पीठ,ब्लॅकेट, चादरी, टी-शर्ट, बरमुडा,कपडे , पिण्याचे पाणी ,औषधे, धान्य, साबण, मेणबत्ती, लायटर, मच्छर अगरबत्ती, सॅनिटरी नॅपकिन, मास्क ,सॅनिटायझर्स,टॉवेल, साड्या, बिस्किटे, वह्या-पुस्तके,शालेय साहित्य व किराणा सामान अशा विविध जीवनावश्यक वस्तू मदत शिवसेना शहर शाखा, गणपती मंदिर जवळ, उरण येथून आज शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली महाड- पोलादपूर तालुक्यासाठी रवाना झाली.

या वेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी शिवसेना उरण तालुक्यातील व शहरातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवासेना, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक व वैद्यकीय संघटना, सेवाभावी संघटना व व्यापारी वर्ग व ज्यांनी हया सामाजिक कार्यात मदत केली आहे, त्या सर्वांचे आभार मानले आहेत.

यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर , उरण नगरपालिकेचे शिवसेना गटनेते गणेश शिंदे, कामगार नेते महादेव घरत, शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, म्हात्रे, नगरसेवक अतुल ठाकूर, माजी नगराध्यक्ष परमानंद करगुटकर, उपतालुकाप्रमुख जयवंत पाटील, उपतालुका संघटक के एम घरत, अमित भगत, मनोज पाटील, एस के पुरो, धनेश ठाकूर, संदीप जाधव, धीरज बुंदे, कैलास पाटील, एजाज मुकादम, रफिक मुल्ला,प्रदीप शेळके, धनाजी भोईर,रवीद्र पाटील, अनिल पाटील, इस्माईल शेख, महेश वर्तक, शिक्षक सेनेचे कौशिक ठाकूर, महेश गावंड, महिला संघटिका(शहर) श्रीमती सुजाता गायकवाड, शहर संघटिका सौ मेघा मेस्त्री, शहर संपर्क संघटिका सौ श्रद्धा सावंत, श्रीमती वंदना पवार, उपशहरप्रमुख सौ माधुरी चव्हाण, मुमताज भाटकर, सायरा खान व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.