Press "Enter" to skip to content

रोहा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव


भय इथले संपत नाही रुग्णांचा आकडा १७८ वर


अत्यंत विदारक परिस्थिती


सिटी बेल लाइव्ह / रोहा (शरद जाधव)


रोहा तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोना विषाणूने हेदोस घातला आहे आज प्रशासाना कडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोंनो रुग्णांचा आकडा १७८ वर जाऊन पोहचल्याने नागरिक भयभीत झाले आहेत तर भय ईथले संपत नाही अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोनाने संपूर्ण जगामधे चांगलीच दहशत माजवली.भारतात याची महिती उशिरा मिळाली तरी देखील देशाने चांगली खबरदारी घेतली. मार्च महिन्यात टाळे बंदी जाहीर केली मात्र कोरोना आटोक्यात आला नाही मुंबई पुणे येथे वाढणारा कोरोंना ग्रामीण भागात कधी येऊन पोहचला हे कळले सुद्दा नाही .रोहा तालुक्यात प्रशासणांने चांगली खबरदारी घेतली होती. मात्र हा सन्सर्ग आजार असल्याने नागरीकानी काळजी घेणे आवशक आहे ते झाले नाही. रोह्यात होयचे तेच झाले आज कोरोनाचा आकडा १७८ वर पोहचला ही रोहेकरा साठी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल रोह्यात सुरवातील ऐनवहाल,मालसई, पाले व घोसाले येथे रुग्ण आढळले.त्यानंतर वरसगाव, रोहा शहर,पडम येथे रूग्ण वाढले इथपर्यंत परिस्थिती आटोक्यात असताना धाटाव मधील सुदर्शनने कोरोनचा बॉम्ब टाकल्याने हजारो कामगार असलेल्या कंपनीत काही रूग्ण सापडले आणि रोह्यात हा हा कार माजला जवलपास ९० रूग्ण याठिकाणी आढळले आहेत पुढे आकडा किती वाढेल हे सांगणे कठीण झाले आहे. रोहा बाजारपेठ पूर्णत: बंद केली असली तरी कंपनीतले किती कुणाला भेटले असतील देव जाणो ही साखळी तोडण्याकरिता प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.रोह्यतील एका नामांकित हाँटेल मालकाला कोरोना झाला आहे.त्यांचे उपचार मोठ्या दवाखान्यात सुरु आहेत तर अनेक रूग्ण आढळत आहेत हे रोह्यवर आलेले संकटच असुन या आलेल्या कोरोना संकटाला मोठ्या धीराने तोंडं देने गरजेचे आहे नागरिकांनी घराबाहेर न पडता,स्वत:ची कळजी घेणे गरजेचे असल्याचे तालुका प्रशासन यंत्रणेने सांगितले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.