Press "Enter" to skip to content

मौजे शेलू येथील के.बी.के नगर मध्ये करण्यात आले अन्नधान्य वाटप

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुक्यातील मौजे शेलू येथील के. बी.के नगर मध्ये आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप करण्यात आले.

21 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील मौजे शेलू येथील के. बी.के नगर मध्ये पाणी घुसले होते अनेक घरे पाण्याखाली गेली होती, येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

या कुटुंबांना आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप करण्यात आले, यावेळी कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, शेलू गावचे सरपंच शिवाजी खारीक, नायब तहसीलदार सुधाकर राठोड , नगरसेवक संकेत भासे, सदस्य रोहन पाटील आणि के बी के नगर मधील सदस्य उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.