सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रायगड जि.मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष,विद्यमान सल्लागार, जेष्ठ साहित्यिक, लेखक तथा पत्रकार नवीनचंद्र सोष्टे यांचे नुकतेच वयाच्या ६९ व्या वर्षी दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात भावपूर्ण श्रद्धांजली
अर्पण करण्यात आली.
अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रदेशाध्यक्ष अरुण माळी,रा.जिल्हाध्यक्ष मधुकर खामकर, रोहे तालुका अध्यक्ष विलास धामणसे,तर जिल्हा पदाधिकारी शैलेश शिलकर,प्रशांत सुतार,संतोष निकम,वैभव शेडगे, गजेंद्र तुडबरकर,निकेश भोईर,परेश सिलिमकर, वैभव शेडगे,मिलिंद भोईर,प्रशांत गोरे,श्रीवर्धन महिला अध्यक्षा भारती शहा आदी उपस्थित होते.
जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ साहित्यिक नवीनचंद्र सोष्टे हे रायगड जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार व रायगड जिल्ह्याचे भूषण होते.त्यांनी आपल्या धारदार लेखनीतून तळागाळातील सामान्य जनतेचे प्रश्न नेहमीच व्रुत्तपत्रातून मांडून न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निधनाने पत्रकारिता साहित्य क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी झाली असल्याचे मनोगत प्रदेशाध्यक्ष अरुण माळी यांनी यावेळी व्यक्त केले.








Be First to Comment