सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
शेंडुग टोलनाक्याजवळील सेंट विल्फ्रेड्स कॉलेजमधील कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे प्राचार्य डॉ .अनिरूध्द ऋषि आणि सेंट विल्फेड्स इंन्स्टिटयुट ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . दिनानाथ झाडे यांच्या सयुंक्त विद्यमाने आइब्रूफेनचे नॅनोपार्टीकल संश्लेषण तसेच त्याच्या औषधीय मुल्यांकनावर ऑस्ट्रेलियन सरकारतर्फे पुढील आठ वर्षांसाठी पेटंट प्रदान करण्यात आले आहे.
डॉ . ऋषि आणि डॉ.झाडे यांचे अनेक भारतीय पेटेन्ट प्रकाशित झालेले आहेत.त्यामधून मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ हर्बल एंट्रासेप्टिव कंपोजिशनसाठी पेटेन्ट प्राप्त झाले आहे . सेंट विल्फेडस ग्रुप ऑफ कॉलेजचे प्रमुख कार्यकारी अधिकारी मुकेश सोनी यांनी सांगितले की डॉ . ऋषि आणि डॉ . झाडे सुरूवातीपासुनच संशोधनाप्रती जागृत राहिलेले आहेत .
आतापर्यंत त्यांचे ५० हुन अधिक रिसर्च पेपर विविध जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत . या व्यतिरीक्त ते ६-६ पीएचडी विद्यार्थ्यांच्या संशोधनाचे मार्गदर्शक आहेत . आताच प्रदान केलेल्या ऑस्ट्रेलियन इनोवेशन पेटेंट हे एक कार्यसंघ आहे .ज्यामध्ये यांनी एकत्रितरित्या आइब्रूफेन नैनोपार्टिकल वर संशोधन केले आहे.आइब्रूफेन हे एक साल्ट आहे जो मुख्यतः वेदनानाशक म्हणून त्याचा उपयोग केला जातो .
यावर प्रभावित होऊन सेंट विल्फ्रेडस ग्रुपचे संचालक डॉ .केशव बडाया यांनी डॉ . ऋषि आणि डॉ . झाडे यांचे अभिनंदन करत असताना सांगितले कि हे पेटेंट विल्फेडस परिवाराचे मोठे यश आहे . या प्रसंगी सेंट विल्फेडस कॉलेजमधील सर्व शिक्षक , कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ . ऋषि आणि डॉ . झाडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .








Be First to Comment