सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत तालुक्यात 21 जुलै रोजी आलेल्या महापुरात आपलं सर्वस्व गमावलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या सूचनेनुसार पार्थ पवार फाऊंडेशन च्या वतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून संसार उपयोगी वस्तू व किराणा सामान वाटप करण्यात येत आहे.

या माध्यमातून महाराष्ट्रभर नेहमीच संकटकाळी धावून सर्व सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पार्थ पवार यांचे प्रयत्न असतात. कर्जत तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा निरीक्षक ॲड.रूपाली दाभाडे, महिलाध्यक्षा ॲड.रंजना धुळे, जिल्हा महिला सरचिटणीस पुजा सुर्वे, शहरध्यक्षा पुष्पा दगडे, गटनेते शरद लाड, राजेश लाड, युवती अध्यक्षा ॲड.प्रतीक्षा लाड, नगरसेविका सुवर्णा निलधे, भारती पालकर, मधुरा चंदन, योगेश गंगावणे, अतुल पवार, मल्हारी माने, सुहास दिघे, जयवंत म्हसे, पप्पू दिघे आदी उपस्थित होते.








Be First to Comment