सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, महाडचे माजी आमदार स्व.माणिकराव जगताप ( आबा ) यांना कर्जत तालुका काँग्रेस कमिटी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी रायगड जिल्हा परिषद सदस्या अनुसया पादिर, माजी नगराध्यक्ष धनंजय चाचड, माजी उपनगराध्यक्ष संजय सुर्वे, कर्जत तालुका कॉंग्रेस किसान सेल अध्यक्ष लक्ष्मण ऐनकर, कर्जत तालुका कॉंग्रेस अध्यक्ष मुकेश तुकाराम सुर्वे, कर्जत तालुका कॉंग्रेस उपाध्यक्ष हेमंत देशमुख, कर्जत तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्ष सागर परदेशी, कर्जत शहर कॉंग्रेस अध्यक्ष इरफान अत्तार, कर्जत शहर कॉंग्रेस सरचिटणीस सुभाष मदन, नेरळ शहर कॉंग्रेस अध्यक्ष आरिफ अत्तार, कर्जत तालुका कॉंग्रेस व्यापारी सेल अध्यक्ष अरविंद कटारिया, कळंब विभाग कॉंग्रेस अध्यक्ष देवीदास ऐनकर, खांडस ग्रामपचायत सदस्य मंगल माळी, कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते पांडुरंग देशमुख, मच्छिंद्र कांबेरे आदी उपस्थित होते.







Be First to Comment