Press "Enter" to skip to content

सुरेश पाटील व जिल्हा परिषद सदस्या पद्माताई पाटील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले

महाडच्या पूरग्रस्तांची परिस्थिती पाहून अश्रू अनावर

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

कोकणात व महाड येथे अतिवृष्टीमुळे लोकांना भयंकर अशा संकटांचा सामना करावा लागत आहे.एकतर कोरोना अन लाॅकडाऊनमुले लोक आर्थिक अडचणीत सापडले असताना त्यात या अति मुसळधार, ढगफुटी सदृश पावसाने जीवनमान विस्कळित झाले आहे.यासाठी महाड तेथील पुरग्रस्ताने बाधित झालेल्या आपल्या कोकणी बांधवाना मदत मिळावी यासाठी रसायनी पाताळगंगा परिसरातील कैरे गावचे माजी उपसरपंच सुरेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ‘एक हात मदतीचा’ या उद्देशाने वडगाव जि.प.सदस्या पद्माताई सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिवनावश्यक वस्तू महाड तालुक्यातील गावांत जावून वस्तूंच्या रुपाने मदत करण्यात आली.

यावेळी माजी उपसरपंच सुरेश पाटील यांनी पूरग्रस्तांना दिलासा देवून त्यांची विचारपूस केली.तर जिल्हा परिषद सदस्या पदमाताई पाटील यांनी पूरग्रस्त महीलांशी संवाद साधून आपलं नैतिक कर्तव्य समजून मदत स्वरुपात दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघा उभयंतांच्या डोळ्यांत तेथील परिस्थिती पाहून अश्रू अनावर झाले.देवा,असे कोणाबरोबर होवू नये अशी प्रार्थना दोघा उभयंतांनी केली.

यात तांदूळ 1300 किलो, मुगडाळ 200 किलो, तुरडाळ 200 किलो,साखर 500 किलो,चहापावडर 250 ग्रमचे 100 नग, बिस्किटे 100 बाॅक्स,बिसलरी 250 बाॅक्स,चटई, ब्लॅंकेट,टाॅवेल प्रि 200 नग,तेल 500 मिली.55 नग,फरसाण,आटा,कांदा, बटाटा प्रति 60 किलो,लसूण 20 किलो, मेणबत्ती 2500 नग, माचिस 500 नग,सॅनिटरी पॅड 180 नग, कोलगेट 50 नग,अंगाची साबण 1500 नग,गहू 50 किलो,रिन साबण 120 नग,मच्छर अगरबत्ती 40 नग, मेडिसिन किट,लेडिज इनर वेअर 50 नग, कंगवा 24 नग,शाम्पू 115,पावडर-22 नग आदी साहित्य तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन वाटप करण्यात आले.यावेली सोबत कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.