सिटी बेल | पेण | वार्ताहर |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष, रायगड जिल्हाध्यक्ष आणि महाड विधानसभेचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या अचानकपणे जाण्याने रायगड जिल्ह्यात काॅग्रेस पक्षाची मोठी पोकळी निर्माण झाली असून एक परखड व्यक्तिमत्त्वाचा एक्झिट झाल्याने त्यांची श्रद्धांजली शोकसभा पेण शहर काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी वाचनालय येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलतांना शहर अध्यक्ष प्रवीण पाटील म्हणाले की दिवंगत माणिकराव जगताप म्हणजे सर्वांचे आबा त्यांनी रायगड जिल्ह्यात काॅग्रेस पक्ष वाढविण्यासाठी खुप मेहनत घेतली असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी आपुलकीची वागणूक दिली.त्यांच्या जाण्याने पक्षाची जिल्ह्यात फार मोठी हानी होत असतांनाच त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना पक्ष वाढविण्याचे काम करावे लागेल तेव्हा ही खरी आबाना श्रद्धांजली होईल असे सांगून प्रवीण पाटील यांनी स्वर्गीय माणिकराव जगताप व अलिगाबचे माजी आमदार मधूकर ठाकूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी जेष्ठ साहित्यिक बाळ सिंगासने, बापुसाहेब नेने, वसंत आठवले, राजा म्हात्रे, सदानंद म्हात्रे, अविनाश भोईर, अशोक जैन, नंदा म्हात्रे, परशुराम म्हात्रे, सुर्यकांत पाटील, निलेश म्हात्रे, हिद्दु कुवारे, हितेश पाटील, आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment