सिटी बेल | महाड |
अतिवृष्टीमुळे महाडमध्ये पूर व दरड कोसळल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पूरग्रस्त व दरडग्रस्तांच्या मदतीसाठी या ठिकाणी केंद्र व राज्यातील भाजप नेते व लोकप्रतिनिधींनी तात्काळ धाव घेऊन पाहणी केली तसेच पूरग्रस्तांना मदतकार्य देणे सुरू केलेे आणि त्यामुळे महाडकरांना मोठा दिलासा मिळाला.
बुधवारी रायगडचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी बुधवारी महाडमध्ये जाऊन पाहणी केली तसेच मदत कार्याचा आढावा घेतला.

यावेळी पनवेलचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल भगत, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अजय बहिरा, प्रदेश सचिव रवी मुंडे, युवा नेते दशरथ म्हात्रे, डॉ. कृष्णा देसाई, भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, सरचिटणीस मिलिंद पाटील, बिपीन महामुणकर, उपाध्यक्ष राजेश मपारा, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, महिला मोर्चा सरचिटणीस मंजुषा कुद्रीमोदी आदी सोबत होते.

या वेळी भाजप नेते, पदाधिकार्यांनी महाड शहरात पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच भाजपच्या वतीने गुरूकुल येथे सुरू करण्यात आलेल्या कॅम्पला भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. या ठिकाणाहून पूरग्रस्तांना अन्न, पाण्यासह कपडे, रेशन किट, अन्य मदत केली जात आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने बी. एस. बुटाला सांस्कृतिक भवनात भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथेही भाजप लोकप्रतिनिधींनी भेट दिली.









Be First to Comment