पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालय, ता.संगमेश्वर जि.रत्नागिरीच्या वतीने मदत
सिटी बेल | रोहे-रायगड | नंदकुमार मरवडे |
सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विद्यालय धामापूर, ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी च्या वतीने चिपळूण येथील पुरग्रस्ताना जीवनाआवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
खरतरं कोकणच्या वैभवात भर घालणारा तालुका म्हणजे चिपळूण होय..
पण.. प्रलयंकारी महापुराने चिपळूण तालुक्याची दैनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पुरग्रस्त बांधवांना गरज आहे मदतीची या भावनेतूनच विद्यालयाच्या वतीने एक हात मदतीचा देऊन खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे.
आज या पुरग्रस्त बांधवांना संपूर्ण महाराष्ट्रातून मदत मिळत आहे.. आपण हि मदत करून त्याचा उध्वस्त झालेला संसार उभा करण्यासाठी सहकार्य करायला हवे. माणूसकीचे दर्शन खर्या अर्थानं घडून यायला हवे.अशा प्रकारची आपल्या मनातील भावना मुख्याध्यापक मनोज जाधव यांनी व्यक्त केली आहे. तर याकामी माझे सर्व सहकारी शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनीही मोलाचे असे सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.तर सदरची मदत त्यांच्या विद्यालयाकडून चिपळूण, मुरादपूर येथील पुरग्रस्त बांधवांना जीवनाआवश्यक वस्तूचे वाटप करून करण्यात आली आहे.








Be First to Comment