सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाच्या मार्फत व एकात्मिक आदिवासी विकास कार्यालय पेण यांच्या वतीने रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मेढा येथील आदिवासीवाडी मेढा, आदिवासीवाडी रेवोली बांधव लाभार्थींना खावटीचे वाटप रोहा पंचायत समितीचे माजी. सभापती लक्ष्मण महाले, ग्रामपंचयातीचे उपसरपंच उदय मोरे यांच्या शुभहस्ते १८ किलो पॅकेजचे वाटप करण्यात आले. तसेच लाभार्थींच्या खात्यामध्ये २०००/- रक्कम जमा करण्यात आली.
तसेच मेढा आदिवासीवाडीतील लाभार्थींना खावटीचे वाटप मेढा हायस्कुलचे चेअरमन भगवान गोवर्धने, उपसरपंच उदय मोरे, पेणचे प्रकल्प अधिकारी भानुशाली साहेब, तालुका निरिक्षक फसाले सर यांच्या शुभहस्ते खावटी वाटप करण्यात आले. लाभार्थींच्या खात्यात २०००/- रक्कम जमा करण्यात आली. शिवाय जे लाभार्थी वंचित राहिले असतील ज्यांचे कागदपत्र अपुर्ण असतील अशा लाभार्थींचे त्याच ठिकाणी माहिती घेऊन फॉम भरण्यात आले. त्यांना ही खावटीचे वाटप करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे प्रकल्प अधिकारी भानुशाली साहेब, गायकवाड साहेब यांनी माहिती देताना सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करताना जेष्ट पत्रकार तथा उपसरपंच उदय मोरे म्हणाले की, गेली २ वर्ष कोरोनाशी सामना करताना अनेकांना आपले जीव गमवावे लागले तर अनेकांनवर उपवास मारीची तसेच बेरोजगारीची समस्या उभी आहे. त्यातच गरीब आदिवासी बांधवांना ही काम नसल्याने त्यांना ही आर्थिक समस्यांना तोंड दयावे लागतय या सर्व बांबीचा महाराष्ट्र शासनांनी व आघाडीतील मंत्रानी महत्व पुर्ण निर्णय घेऊन आदिवासी बांधवांना खावटीचे वाटप करण्याचा महत्व पुर्ण निर्णय घेऊन दिलासा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य च्या राज्यमंत्री तथा रायगड जिल्हाच्या कर्तत्वदक्ष पालकमंत्री नामदार आदितीताई तटकरे यांनी रायगड जिल्हासाठी भरीव निधी उपलब्ध करत असताना जिल्हातील सर्वच आदिवासी बांधवांना कोरोना कालात आर्थिक व मदतीची गरज असतानाच त्यांनी मोठया प्रमाणात खावटी वाटपाचा कार्यक्रम जिल्हात घेतला आहे. शासनाच्या विविध योजनेचा लाभ समाजातील प्रत्येक घटकांन पर्यंत पोचलाच पाहिजे यासाठी प्रत्येक लाभार्थींनी योजनेसाठी लागणारा कागदपत्राची योग्य वेळी पुर्तता आवश्यक असल्याचे शेवटी उपसरपंच उदय मोरे यांनी सागितले. तसेच चेअरमन भगवान गोवर्धने यांनी शासनानी खावटी वाटपाचा कार्यक्रम घेतल्याने त्यांना धन्यवाद दिले.
या कार्यक्रमला प्रकल्प अधिकारी भानुशाली साहेब, माजी सरपंच विलास उंबरे, ग्रामपंचायत सदस्य नम्रता महाले, शेवंती शिद, माजी उपसरपंच दिनेश घरट, तालुका अधिकारी फसाले सर, गायकवाड सर, पाटील सर, ए.स. सोडेकर, पी.के. पाटील, मोर्ले सर, पी.डी. मोरे सर, प्रशांत महाले, प्रिती खांडेकर, पोलीस पाटील, हरिश्चंद्र घरट, भिसे तंटामुक्त अध्यक्ष हरिश्चंद्र ठमके उपस्थित होते. तालुक्यातील ३७६८ लाभार्थींना खावटी वाटपाचा लाभ मिळणार आहे. रेवोली येथील ३७ लाभार्थी व मेढा येथील ३४ लाभार्थींना खावटी वाटप करण्यात आले. उपस्थितीचे स्वागत आभार गायकवाड सर यांनी मानले.








Be First to Comment