Press "Enter" to skip to content

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून गोवारी कुंटुंबियांचे सांत्वन

सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी |

कामोठे येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठू काल्या गोवारी उर्फ विठूशेठ यांचे निधन झाल्याने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गोवारी कुटुंबियांचे सांत्वन केले.

विठू गोवारी यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कुलचे १५ वर्षे स्थानिक स्कुल कमिटी चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय आदी समाजोपयोगी क्षेत्रात त्यांचे कार्य नेहमीच उल्लेखनीय राहिले आहे. तसेच प्रेमळ व हसतमुख आणि मनमिळावू स्वभाव म्हणून विठू गोवारी परिचित होते. त्यांचे अल्पशा आजाराने शनिवार दिनांक २४ जुलै रोजी निधन झाले.

वृत्त कळताच लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठे येथे गोवारी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सामाजिक, राजकारण, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात काम करणारा आणि समाजाची जाण असलेला ज्येष्ठ कार्यकर्ता हरपल्याचे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आदरांजली वाहताना केले.

यावेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, दिलीप पाटील, प्रदीप भगत, ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर पाटील, रमेश म्हात्रे, प्रकाश पाटील, संतोष म्हात्रे, आर. जी. म्हात्रे, गणेश भगत, गोपीनाथ गोवारी, मधुकर सुरते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. विठू गोवारी यांचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक ०२ ऑगस्ट रोजी भिंगारी येथील श्री क्षेत्र मामा भाचे येथे तर उत्तरकार्य गुरुवार दिनांक ०५ ऑगस्टला कामोठे येथील राहत्या घरी होणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.