Press "Enter" to skip to content

लॉकडाउनच्या काळात सारडे विकास मंचने दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश

सिटी बेल लाइव्ह / उरण (विट्ठल ममताबादे)

करोना रोगाच्या पार्श्वभूमीवर 22 मार्च पासून देशात सर्वत्र लॉक डाउन व संचारबंदि लागू आहे.सध्या सर्वत्र करोना रोगाने हाहाकार माजविला आहे. मात्र यातच सारडे विकास मंच या सामाजिक व पर्यावरणचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या संस्थेने लॉक डाउन व संचारबंदीचे नियम पाळत सोशल, फिजिकल डिस्टन्स ठेवून सारडे गावालगत कोमनादेवी मंदिर डोंगर परिसरात वृक्ष लागवड करून लॉक डाउन व संचार बंदीच्या काळातही वृक्ष लागवड करून वृक्षांप्रती,निसर्गाप्रती आपली संवेदना जागृत ठेवली आहे.

दिवसेंदिवस होणारा पर्यावरणाचा -हास व निसर्ग संवर्धनाकडे मनुष्याचे होणारे दुर्लक्ष लक्षात घेवून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश देत सारडे विकास मंच तर्फे सारडे येथील कोमनादेवी डोंगर परिसरात वृक्षा रोपण करण्यात आले यावेळी प्रत्येकाने एक तरी झाड़ लावून ते वाढविण्याचा,जगविण्याचा संकल्प केला. यावेळी वशेणी गावचे माजी सरपंच प्रसाद भाई पाटील,आदर्श शिक्षक विद्याधर पाटील ,श्रीमंत कौशिक ठाकूर, संदीप पाटील,अल्पेश जोशी,मंगेश पाटील, रोहित पाटील,सुयोग म्हात्रे,
शिक्षक निवास गावंड, अमित ठाकुर, दिनेश पाटील, रोहित पाटील,अनिल घरत,समाधान पाटील, नवनीत पाटील,संपेश पाटील,रोशन पाटील,रोहित पाटील,मंगेश पाटील,मिलन पाटील,कांतीलाल म्हात्रे,प्रतिश म्हात्रे,तेजस म्हात्रे,अल्पेश जोशी,रोहित पाटिल आदि निसर्गप्रेमी मान्यवर उपस्थित होते.अथक मेहनत घेत सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी नागेंद्र म्हात्रे यांच्या संकल्पनेतून दोन वर्षा पूर्वी ओसाड असलेल्या ह्या डोंगर माथ्यावर सध्या वनराईच नंदनवनचं फुलवलंय ते सारडे विकास मंचच्या सर्व परिवाराने.त्यामुळे लॉक डाउनच्या काळातही सारडे विकास मंचने निसर्ग संवर्धन व संरक्षणाचा संदेश वृक्ष लागवड करून प्रत्यक्ष कृतीतुन दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.